Rice Water Benefits : उन्हाळ्यात शरीर ठेवेल थंडगार! तांदळाच्या पाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे जाणून घ्या

Mayuri Gawade

उन्हाळ्यात शरीर थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी तांदळाचं पाणी एक उत्तम नैसर्गिक पेय मानलं जातं. | सर्व प्रतिमा 'एआय'ने बनविल्याआहेत.
भात शिजवल्यानंतर उरलेलं स्टार्चयुक्त पाणी अनेक घरांमध्ये पारंपरिक थंड पेय म्हणून वापरलं जातं.
हे पाणी पचायला हलकं असून शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करतं.
तांदळाच्या पाण्यातील नैसर्गिक कर्बोदकं शरीराला झटपट ऊर्जा देण्याचं काम करतात.
त्यात भाजलेलं जिरे, काळं मीठ आणि लिंबाचा रस घातल्यास चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात.
ताक किंवा इतर पेयांच्या तुलनेत तांदळाचं पाणी अधिक सौम्य आणि हलकं असतं.
हे पेय उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतं आणि पोटासाठीही फायदेशीर मानलं जातं.
तांदूळ स्वच्छ धुऊन ३ कप पाण्यात मऊ होईपर्यंत शिजवल्यानंतर त्याचं पाणी वेगळं काढून घ्यावं.
त्यात जिरेपूड, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून थंड करून प्यायल्यास चव अधिक वाढते.
घरच्या घरी सहज तयार होणारं हे पारंपरिक पेय उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.