रिंकू राजगुरु २० वर्षांनी वारीत; पुन्हा वडिलांसोबत तोच क्षण अनुभवतेय

नेहा जाधव - तांबे

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु ही यंदा वारीत सहभागी झाली असून, तिने या सोहळ्याचा सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
तब्बल २० वर्षांनंतर ती पुन्हा एकदा पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली. यावेळी तिचे वडील महादेव राजगुरूही सोबत होते. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
लहानपणी वडिलांसोबत अनुभवलेली वारी, आता मोठेपणी पुन्हा एकदा तिने अनुभवली. वारीच्या भक्तीरसात पूर्णपणे तल्लीन झालेली रिंकू भावनिक झाली. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
हिरवी नऊवारी साडी, पारंपारिक दागिने, हातावर मेहंदी, केसात गजरा असा सुंदर सांस्कृतिक पेहराव तिने यावेळी केला होता. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
तिने यासंदर्भात एक खास इंग्रजी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
ही यात्रा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण जेव्हा मी फक्त ४ वर्षांची होते, तेव्हा मी ही वारी वडिलांसोबत पाहिली होती. आज २० वर्षांनंतर पुन्हा एकदा तेच क्षण त्यांच्यासोबत अनुभवते आहे. आपलं 'मूळ' कधीही विसरू नका असा भावनिक संदेशही तिने यातून दिला आहे. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
तिने वारीत टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेकाही धरला. वडिलांसमवेत इतर वारकऱ्यांसोबत ती फुगडी खेळतानाही दिसली. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)
रिंकू पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांसमवेत मिसळून गेली. २० वर्षांपूर्वी वडिलांसोबत अनुभवलेली वारी, आज पुन्हा त्यांच्यासोबत अनुभवताना रिंकू भक्तीरसात रमलेली पाहायला मिळालं. | (Photo - Instagram @iamrinkurajguru)