Rinku Rajguru Photos : अबोली साडी, मोत्यांचा हार अन् लाल बांगड्या; 'जिजाई'च्या प्रमोशनसाठी रिंकू राजगुरूचा पारंपरिक साज

किशोरी घायवट-उबाळे

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी नव्हे, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जिजाई' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
२० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, रिंकू सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
याचदरम्यान रिंकूने तिचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रिंकूने अबोली रंगाची सुंदर साडी नेसली असून, तिचा हा पारंपरिक लूक अत्यंत मनमोहक दिसत आहे.
या साडीसोबत तिने नाजूक मोत्यांचा हार, सुंदर कानातले आणि लाल बांगड्या असा पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
साध्या पण आकर्षक पारंपरिक अंदाजातील रिंकूच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिग्दर्शक तृशांत इंगळे यांच्या 'जिजाई' चित्रपटात रिंकूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसत आहेत.
स्त्रीचा संघर्ष, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद मांडणाऱ्या या चित्रपटात रिंकू मध्यवर्ती भूमिकेत आहे.
(All Photos - Instagram/ @iamrinkurajguru