कॉटनची साडी आणि मोकळे केस; मराठमोळ्या रिंकूचा साडीतला सुंदर लूक

Swapnil S

सैराट फेम रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चहत्त्यांसाठी नेहमी नवनवीन स्वतःच्या पोस्ट शेअर करत असते.
नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत.
रिंकूने प्रिंटेड अशी गोल्डन बॉर्डर असणारी गुलाबी रंगाची कॉटन साडी नेसली आहे. रिंकूचा हा कॉटन साडी लूक अगदी चॅन वाटत आहे.
रिंकूने या साडीसह सहज आणि सुंदर दिसतील असे केस मोकळे ठेवले आहेत. या साडीसह तिने सोन्याचे कानातले गळ्यात साधीशी चैन आणि हातात एक बांगडी आणि दुसऱ्या हातात घड्याळ, एका बोटात साधीशी अंगठी घालत लूक पूर्ण केला आहे.