अशी आहे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची कारकिर्द

प्रतिनिधी

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला असून तो या अपघातातून थोडक्यात बचावला

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला पंतची स्थिती आता धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

ऋषभ पंतने २०१७मध्ये भारतीय टी - २० संघात पदार्पण केले.

आत्तापर्यंत त्याने ६६ सामने खेळले असून २२.४३च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत

यानंतर त्याने २०१८मध्ये त्याने भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघातून पदार्पण केले.

३० एकदिवसीय सामन्यात त्याने ८६५ धावा, तर ३३ कसोटी सामन्यात त्याने २२७१ धावा केल्या आहेत

२०१६मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघामध्ये खेळात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्याने ९८ सामने खेळले असून ३४.६१ सरासरीने २८३८ धावा केल्या आहेत

आयपीएलमध्ये सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत असून त्याने अनेकदा कर्णधारपदही सांभाळले आहे.

गेल्या २ वर्षांमध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आयसीसीच्या क्रमवारीत तो ६व्या स्थानावर विराजमान आहे