रस्त्यावरील पांढऱ्या-पिवळ्या रेषा काय सांगतात? जाणून घ्या प्रत्येक रोड मार्किंगचा अर्थ
Mayuri Gawade
रस्त्यावर दिसणाऱ्या पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा केवळ सजावटीसाठी नसतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना विशेष महत्त्व असते.
रस्त्याच्या मधोमध असलेली तुटक पांढरी रेषा सुरक्षित परिस्थितीत लेन बदलण्याची किंवा ओव्हरटेक करण्याची परवानगी दर्शवते.
सलग पांढरी रेषा दिसत असेल, तर लेन बदलणे किंवा ओव्हरटेक करणे टाळा. अशा ठिकाणी स्वतःच्या लेनमध्येच वाहन चालवणे आवश्यक असते.
रस्त्यावरील एक सलग पिवळी रेषा ओव्हरटेक करण्यास मनाई असल्याचे दर्शवते. ही रेषा ओलांडणे नियमबाह्य ठरू शकते.
रस्त्यावर दोन सलग पिवळ्या रेषा असतील, तर लेन बदलणे, ओव्हरटेक करणे, यू-टर्न घेणे किंवा वळणे पूर्णपणे प्रतिबंधित असते.
तुटक पिवळी रेषा दिसल्यास योग्य काळजी घेऊन आणि समोरचा रस्ता मोकळा असल्याची खात्री करूनच ओव्हरटेक किंवा लेन बदलता येते.
झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांसाठी असते. पादचारी रस्ता ओलांडत असताना वाहन थांबवणे ही प्रत्येक चालकाची जबाबदारी आहे.
सिग्नलजवळ असलेली स्टॉप लाईन ओलांडू नका. लाल सिग्नल असताना वाहन या रेषेच्या मागेच थांबवणे बंधनकारक असते.
रस्त्यावरील प्रत्येक मार्किंगचा वेगळा अर्थ असतो. हे नियम समजून घेतल्यास अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.
वाहतूक नियमांचे पालन केल्याने केवळ दंड टाळता येत नाही, तर स्वतःचा आणि इतरांचा प्रवासही अधिक सुरक्षित होतो. | All Photos : AI Generated