Health Tips : स्वस्त पण सुपरफूड! भाजलेल्या शेंगदाण्यांचे फायदे जाणून घ्या

Mayuri Gawade

भाजलेले शेंगदाणे हे चविष्ट आणि पौष्टिक स्नॅक मानले जातात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.
शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असल्यामुळे ते पोट भरून ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्याच्या डाएटमध्येही शेंगदाण्यांचा समावेश फायदेशीर मानला जातो.
शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये असलेले व्हिटामिन B१ आणि B३ मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात.
मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारखे घटक हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
शेंगदाण्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
मात्र शेंगदाणे नेहमी मर्यादित प्रमाणात खाणे आवश्यक असून अति सेवन टाळणे गरजेचे आहे. | ALL IMAGES : AI GENERATED