मोरपंख, पारंपरिक दागिने अन् मोहक हास्य; रुमानी खरेच्या जन्माष्टमी फोटोशूटने वेधलं लक्ष

Mayuri Gawade

प्रसिद्ध कवी आणि गायक संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे तिच्या खास फोटोशूटमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने रुमानीने ‘राधा’च्या रूपातील पारंपरिक फोटोशूट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जन्माष्टमीच्या या खास फोटोशूटमध्ये रुमानीचा राधा लूक अतिशय मोहक आणि पारंपरिक अंदाजात पाहायला मिळत आहे.
मोरपंखी हिरवा आणि निळ्या छटांचा साडी-लेहेंगा रुमानीच्या या राधा लूकला अधिक उठावदार बनवत आहे.
गुलाबी रंगाच्या ब्लाऊजसोबत मोरपंखी रंगाच्या साडीची केलेली जुळवाजुळव तिच्या लूकमध्ये सुंदर रंगसंगती निर्माण करते.
कपाळावरील नाजूक डिझाइन, मांगटिका आणि पारंपरिक दागिन्यांमुळे रुमानीच्या राधा अवताराला अधिक देखणेपणा मिळाला आहे.
हिरव्या बांगड्या, सोनसळी कडे आणि हातावरील सुंदर नक्षीकामामुळे तिच्या पारंपरिक श्रृंगाराची प्रत्येक बारकाई उठून दिसते.
वेणीतील फुलं आणि चेहऱ्याभोवती सोडलेल्या कुरळ्या बटांमुळे रुमानीच्या लूकला जुन्या काळातील राधेची नाजूक झलक मिळते.
मोरपिसांचा वापर करत दिलेल्या पोझमध्ये रुमानीचा हा लूक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वातावरणाशी अगदी साजेसा दिसत आहे.
साधा मेकअप, पारंपरिक दागिने आणि मोहक हास्य यामुळे रुमानीचा हा ‘राधा’ अवतार चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.