नवरात्रीचा पहिला रंग अन् रुपाली भोसलेचा खास अंदाज; केशरी पैठणी ड्रेसमधील फोटो पाहिलेत का?
Mayuri Gawade
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसलेने आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे रुपालीला विशेष लोकप्रियता मिळाली आणि तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं.
अभिनयासोबतच रुपाली तिच्या उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते आणि पारंपरिक तसेच आधुनिक पेहरावात ती नेहमीच उठून दिसते.
सोशल मीडियावर सक्रिय असलेली रुपाली वेगवेगळ्या फोटोशूटमधून आपल्या चाहत्यांना फॅशनची झलक दाखवत असते.
आता नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी रुपालीने केशरी रंगाचा सुंदर पैठणी ड्रेस परिधान करत खास मराठमोळं फोटोशूट केलं आहे.
केशरी पैठणी ड्रेससोबत पारंपरिक नथ, सोन्याचे दागिने, हिरव्या बांगड्या आणि आकर्षक हेअरस्टाइलमुळे रुपालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या केशरी रंगाला साजेशा या फोटोशूटमध्ये रुपालीने दिलेल्या सुंदर पोझ आणि तिचं मोहक हास्य लक्ष वेधून घेत आहे.
पारंपरिक असो किंवा आधुनिक पेहराव, प्रत्येक लूक आत्मविश्वासाने सादर करणारी रुपाली आपल्या खास फॅशन स्टाइलमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. | All Photos : Instagram | Rupali Bhosale