रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज; 'साज शृंगार' म्हणत शेअर केले खास फोटो
किशोरी घायवट-उबाळे
'लपंडाव' मालिकेतील तेजस्विनी कामत म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने खास पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रुपालीने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची सुंदर नऊवारी नेसली असून, या लूकमध्ये तिचा पारंपरिक अंदाज अधिकच खुलून दिसत आहे.
कानात नक्षीदार सोनेरी झुमके तर कानाच्या वरच्या भागात एथनिक बुगडी घालून रुपालीने पारंपरिक दागिन्यांची सुंदर सांगड घातली आहे.
रुपालीने नाकात मोती आणि लाल खडे असलेली पारंपरिक नथ घातली आहे. या नथीमुळे तिच्या मराठमोळ्या लूकला खास उठाव मिळाला आहे.
नऊवारीवर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज रुपालीने परिधान केला आहे. ब्लाऊजच्या बाहींवर आणि पाठीवर नाजूक एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे.
कपाळावरील चंद्रकोर आणि अगदी नॅचरल मेकअपने रुपालीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. तिच्या या साध्या पण खुललेल्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
रुपालीने केसांचा सुबक आंबाडा बांधून त्यावर फुले माळली आहेत. त्यामुळे तिचा लूक अगदी अस्सल महाराष्ट्रीयन वाटत आहे.
रुपालीने हे सुंदर फोटो शेअर करत 'साज शृंगार' अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या पारंपरिक अंदाजातील फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.