Navratri 2026 : केशरी रंगात सजली ऋतुजा बागवे; नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे खास फोटो शेअर
किशोरी घायवट-उबाळे
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री ऋतुजा बागवेने खास पारंपरिक लूक करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केशरी रंगाच्या नऊवारी साडीत ऋतुजाचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
या नऊवारी साडीवर तिने गोल्डन रंगाचा ब्लाउज परिधान केला असून, तिच्या लूकला रॉयल टच मिळाला आहे.
कपाळावरील चंद्रकोर आणि नाकातील पारंपरिक नथ यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
हातात हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्या घालून तिने पारंपरिक मराठमोळा साज पूर्ण केला आहे.
गोल्डन ज्वेलरीची निवड करत ऋतुजाने आपल्या लूकमध्ये सुंदर आणि आकर्षक दागिन्यांची जोड दिली आहे.
केशरी नऊवारी, सोनेरी दागिने आणि गजरा यांचा सुंदर मेळ तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतो.
साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुरेख संगम ऋतुजाच्या या नवरात्री स्पेशल लूकमध्ये दिसून येतो.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी पारंपरिक लूक करण्याचा विचार करत असाल, तर ऋतुजा बागवेची ही स्टाइल नक्कीच तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते.