कुरकुरीत साबुदाणा पापड कसे बनवायचे? वाचा सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात बनवले जाणारे साबुदाणा पापड हे हलके, कुरकुरीत आणि उपवासासाठीही उत्तम मानले जातात. घरच्या घरी केलेले पापड चविष्ट तर लागतातच, शिवाय वर्षभर साठवूनही ठेवता येतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
साबुदाणा पापड बनवताना सर्वात आधी साबुदाणा स्वच्छ धुऊन काही वेळ पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे साबुदाणा मऊ होतो आणि शिजवताना पापडाचा पोत छान येतो.
भिजवलेला साबुदाणा पाण्यात शिजवताना सतत ढवळत राहणे गरजेचे असते. यामुळे मिश्रण एकजीव होते, गुठळ्या होत नाहीत आणि पापड पारदर्शक व छान तयार होतात.
साबुदाणा शिजल्यानंतर त्याचे मिश्रण ना खूप पातळ, ना खूप घट्ट असावे. योग्य घट्टपणा असेल तर पापड पसरवायला सोपे जातात आणि वाळल्यानंतर कुरकुरीत होतात.
तयार मिश्रण स्वच्छ प्लास्टिक शीट किंवा कापडावर छोटे-छोटे पापड घालून उन्हात वाळत ठेवा. पापड एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या.
साबुदाणा पापड १ ते २ दिवस कडक उन्हात वाळू द्या. पापड पूर्ण कोरडे झाले की ते सहज निघतात आणि तळल्यानंतर सुंदर फुलतात.
पापड पूर्ण वाळल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. असे पापड वर्षभर टिकतात आणि चहासोबत किंवा जेवणात झटपट तळून खाता येतात.