परफेक्ट साबुदाणा खिचडीचं सीक्रेट! भिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
किशोरी घायवट-उबाळे
मध्यम आकाराचा दर्जेदार साबुदाणा वापरल्यास खिचडी मोकळी आणि छान तयार होते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
साबुदाणा नीट धुवा - २-३ वेळा हलक्या हाताने धुवून अतिरिक्त स्टार्च काढून टाका.
साबुदाण्याच्या पातळीइतकेच पाणी घालून ५-६ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा.
दाणा बोटांमध्ये सहज दाबला गेला तर तो योग्य प्रकारे भिजला आहे.
शेंगदाणा कूट आणि मीठ शेवटी मिसळा - खिचडी करण्याआधीच शेंगदाणा कूट आणि मीठ घातल्याने दाणे चिकटत नाहीत.
मंद-मध्यम आचेवर हलक्या हाताने परता - जास्त वेळ शिजवू नका. त्यामुळे खिचडी मोकळी राहते आणि लगदा होत नाही.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)