इंडो-वेस्टर्न स्टाईल आणि बॅकलेस टॉप; सई ताम्हणकरचा बोल्ड लूक चर्चेत, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. | (सर्व छायाचित्रे: Instagram/saietamhankar)
इंडो-वेस्टर्न, बॅकलेस डिझाइन आणि फ्रिंज स्टाईल टॉपमुळे सईचा फॅशन स्टेटमेंट चर्चेत आला आहे.
लाल आणि काळ्या रंगाचा आउटफिट त्यावर शोभतील असे ऑक्सिडाइज कडे आणि रिंग यामुळे तिचा लूक अधिक बोल्ड आणि आकर्षक दिसला.
काळ्या हाय-वेस्ट पँटसोबत सईने आपला ट्रेंडी आणि क्लासी लूक पूर्ण केला.
सईच्या बॅकलेस टॉपने सर्वांचे लक्ष वेधून घेत तिच्या लूकची प्रशंसा केली आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि कॉन्फिडंट स्टाईलने सईचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.