मराठी ते हिंदी... सई ताम्हणकरचं दोन्ही इंडस्ट्रीत दमदार अधिराज्य; 'तुंबाडची मंजुळा'मुळे पुन्हा चर्चेत
Mayuri Gawade
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत सातत्याने दमदार काम करत सई ताम्हणकरने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
ओटीटी, वेब सिरीज आणि चित्रपट अशा प्रत्येक माध्यमात सईच्या अभिनयाची कायम चर्चा रंगताना दिसते.
‘मटका किंग’ जगभर ट्रेंड झाल्यानंतर आता सई पुन्हा एका नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात सई ताम्हणकर एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर सईच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
'गुलकंद’मधील सुंदर भूमिकेनंतर सई आता ‘तुंबाडची मंजुळा’मधून पुन्हा चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारत सईने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘दुनियादारी’, ‘मिडियम स्पायसी’, ‘पाँडिचेरी’ आणि ‘वजनदार’सारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही चर्चेत असतात.
‘मिमी’, ‘डब्बा कार्टेल’, ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘मटका किंग’मधील सईच्या हिंदी प्रोजेक्ट्सनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली.
दर्जेदार कथा आणि वैविध्यपूर्ण भूमिका निवडत सई ताम्हणकर आज मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीतील ‘क्रॉसओव्हर क्वीन’ म्हणून ओळखली जाते. | INSTAGRAM : SAI TAMHANKAR