Sai Tamhankar Photos : जांभळ्या साडीत सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अवतार; डिझायनर टोपी अन् युनिक ज्वेलरीने वाढवली शोभा

किशोरी घायवट-उबाळे

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सई गडद जांभळ्या रंगाच्या सुंदर डिझायनर साडीत दिसत असून तिचा लूक एकदम रॉयल वाटत आहे.
या फोटोंमध्ये सई गडद जांभळ्या रंगाच्या सुंदर डिझायनर साडीत दिसत असून तिचा लूक एकदम रॉयल वाटत आहे.
ब्लाऊजवरील बारकाईने केलेले भरतकाम आणि डीप व्ही-नेक डिझाइन तिच्या लूकला खास बनवत आहे.
या संपूर्ण लूकमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सईने डोक्यावर घातलेली नक्षीदार डिझायनर टोपी!
दागिन्यांमध्ये तिने मोठे पारंपरिक कडे, सुंदर अंगठ्या आणि बोटांना जोडणारे हटके हस्तफूल घातले आहे.
मोकळे केस, कपाळावरची छोटीशी टिकली आणि स्मोकी आय मेकअप यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
साडी, ब्लाऊज, टोपी आणि युनिक ज्वेलरी यांची सुंदर सांगड घालत सईने पारंपरिक लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.
सईचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.