Sai Tamhankar Photos : सई ताम्हणकरच्या सौंदर्याची भुरळ; पटोला साडीतील हटके पारंपरिक लूक चर्चेत
किशोरी घायवट-उबाळे
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलमुळेही नेहमी चर्चेत असते.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सईने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सईने निळ्या रंगाची आकर्षक पटोला प्रिंट असलेली साडी नेसली आहे.
साडीला असलेली लाल रंगाची किनार आणि रंगीबेरंगी नक्षीकाम तिच्या लूकला खास पारंपरिक अंदाज देत आहे.
या साडीसोबत तिने लाल रंगाचा सुंदर डिझाइन असलेला ब्लाउज परिधान केला आहे.
गळ्यातील मोत्यांचा हार, कानातील झुमके आणि इअर कफमुळे तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली आहे.
केसांचा नीटनेटका अंबाडा आणि साध्या मेकअपने सईने आपला हा रॉयल पारंपरिक लूक पूर्ण केला आहे.
सईच्या साडीतील फोटोंवर चाहत्यांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, तिच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.