Sai Tamhankar Look : फॉर्मल शर्ट, ग्रे टाय अन् बॉसी अंदाज; सई ताम्हणकरचा हटके लूक पाहिलात का?

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'चार यार' या नव्या वेब सीरिजच्या विशेष स्क्रीनिंगसाठी सईने हटके आणि स्टायलिश लूक केला होता.
स्काय ब्लू फॉर्मल शर्ट, ग्रे रंगाची टाय, ब्लॅक हँडग्लोव्हज आणि स्कर्ट असा तिचा लूक खास लक्षवेधी ठरला.
या फॉर्मल लूकसोबत सईने आपल्या स्टाइलमध्ये बॉसी आणि एलिगंट अंदाजाची झलक दाखवली.
अनोखी हेअरस्टाइल, सिंपल मेकअप, युनिक रिंग्स... नेहमीच्या ग्लॅमरस लूकपेक्षा तिचा हा वेगळा अंदाज चाहत्यांना भावत आहे.
सईच्या या खास फोटोशूटमधील प्रत्येक पोझ तिच्या स्टायलिश व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवते.
२३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'चार यार’ या वेब सीरिजमध्ये सई महत्त्वाच्या सहाय्यक भूमिकेत दिसत आहे.
तिच्या या अनोख्या फॉर्मल लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, चाहत्यांकडून तिच्या स्टाइलचे कौतुक केले जात आहे.
(सर्व छायाचित्र : Instagram/ @saietamhankar)