श्रावणात बहरलाय साक्षी गांधीचा मराठमोळा लूक

नेहा जाधव - तांबे

मराठी अभिनेत्री साक्षी गांधी ही नेहमीच नवनवीन फोटोशूट करत असते. | (Photo - Insta/gandhisakshee_)
सहकुटुंब सहपरिवार, नवी जन्मेन मी अशा मराठी मालिकामधून घराघरात पोहचलेली साक्षी सध्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. | (Photo - Insta/gandhisakshee_)
कोण होतीस तू काय झालीस तू मध्ये साक्षी नकारात्मक भूमिकेत दिसत असली तरी प्रेक्षकांना तीची ही भूमिका आवडत आहे. | (Photo - Insta/gandhisakshee_)
नुकताच तिने आपला मराठमोळा साज केलेला लूक शेयर केला आहे. | (Photo - Insta/gandhisakshee_)
हा लूक तिने खास श्रावण निमित्त मंगळागौर कार्यक्रमासाठी केला आहे. | (Photo - Insta/gandhisakshee_)
जांभळी नऊवारी साडी, मोत्यांचे पारंपारिक दागिने, चंद्रकोर.. या रूपात साक्षी अगदी शोभून दिसतेय. | (Photo - Insta/gandhisakshee_)
या पारंपारिक मराठमोळ्या रूपावर प्रेक्षकही भाळले आहेत. | (Photo - Insta/gandhisakshee_)