हिरवा कुर्ता, ऑक्सिडाइज्ड झुमके अन् चेहऱ्यावर गोड हास्य; अभिनेत्री साक्षी गांधीचा सोज्वळ लूक चर्चेत, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी सध्या 'इंदुरानी' ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
१५ जूनपासून झी मराठीवर सुरू झालेल्या या मालिकेत साक्षीचा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय.
नुकतेच साक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंसोबत तिने 'मन शेवंतीचे फूल झाले तुला पाहण्या' अशी खास कॅप्शन लिहिली आहे.
हिरव्या रंगाच्या प्रिंटेड कुर्त्यामध्ये साक्षीचा पारंपरिक आणि साधा लूक खुलून दिसतोय.
मोकळ्या वातावरणात हसतमुख अंदाजात साक्षीने फोटोसाठी दिलेल्या पोझ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
पिवळ्या रंगाचा सलवार आणि ऑक्सिडाइज्ड झुमके असा तिचा लूक लक्षवेधी ठरला आहे.
मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेपेक्षा या फोटोंमधील साक्षीचा सोज्वळ आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.