आई होण्याआधी समांथाच्या घरी खास पूजा; पती राज निदिमोरूसोबतचे सुंदर फोटो आले समोर

Mayuri Gawade

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत असून, लवकरच ती आई होणार आहे.
समांथाने नुकतेच तिच्या घरात पार पडलेल्या खास पूजेचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या पूजेदरम्यान कुटुंबातील महिलांनी समांथाच्या डोक्यावर हात ठेवून तिला प्रेमाने आशीर्वाद दिले.
या खास पूजेच्या निमित्ताने समांथाने घरातील ज्येष्ठ महिलेसोबत फोटो काढला असून, दोघींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
गडद लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये समांथा सुंदर दिसत असून, राज निदिमोरूसोबतचे तिचे प्रेमळ क्षण लक्ष वेधून घेत आहेत.
समांथा आणि राज दोघेही पारंपरिक पोशाखात एकत्र बसून मनोभावे पूजा करताना दिसत आहेत.
घरातील या खास पूजेसाठी कुटुंबातील महिलाही पारंपरिक साड्या नेसून उपस्थित राहिल्या होत्या.
समांथाने या खास समारंभातील कुटुंबाबरोबरचे आनंदी क्षण शेअर केले असून, तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
All Photos : Instagram | Samantha Ruth Prabhu