समांथाच्या हातातील भारी डायमंड रिंग पाहून चाहते चकित; 'फेब्रुवारीपासूनच दिली होती हिंट!'

Mayuri Gawade

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निधीमोरू अखेर विवाहबंधनात अडकले, आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. | सर्व छायाचित्र : इंस्टाग्राम (Samantha Ruth Prabhu)
कोयंबतूरच्या लिंग भैरवी मंदिरात झालेलं हे साधंसुधं पण अत्यंत सुंदर लग्न चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज ठरलं.
लाल पारंपरिक साडीत सुंदर दिसत असलेली समांथा आणि पांढऱ्या कुर्त्यात राज-दोघांचेही लग्नातील फोटो काही क्षणातच व्हायरल झाले.
परंतु या सर्वात जास्त चर्चा झाली ती समांथाच्या हातात चमकणाऱ्या प्रचंड डायमंड रिंगची.
हिऱ्याचा कट, त्याची चमक… सगळंच परफेक्ट! पण मनोरंजक म्हणजे ही अंगठी चाहत्यांनी याआधीही पाहिलेली होती.
समांथाने फेब्रुवारी १३ रोजी शेअर केलेल्या एका क्लोज-अप फोटोमध्येही हीच रिंग तिच्या हातात दिसत होती.
त्या वेळीही अनेकांनी कमेंट करत “ती एंगेज झालीये का?” असा प्रश्न विचारला होता.
समांथाच्या नंतरच्या अनेक पोस्टमध्येही हीच अंगठी दिसल्याने तर्कवितर्कांना अधिक जोर आला.
त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच समांथा आणि राजने गुपचूप साखरपुडा केला होता का, अशी उत्सुकता आता पुन्हा वाढत आहे.