'सनई चौघडे' फेम चिन्मयी साळवीचा एलिगंट लूक; साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
किशोरी घायवट-उबाळे
'सनई चौघडे' मालिकेत शर्वरीच्या भूमिकेत चिन्मयी साळवीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
नव्या फोटोशूटमध्ये तिने साडीतील साधा पण मोहक लूक साकारला आहे.
चिन्मयीचा सोज्वळ आणि रेट्रो अंदाज सोशल मीडियावर चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
गळ्यात नाजूक चेन, हातात ब्रेसलेट आणि मोकळे केस तिच्या लूकला अधिक उठाव देतात.
'In my 2000s era and i am not getting out of here anytime soon' या कॅप्शनमुळे तिची पोस्ट चर्चेत आली आहे.
साडीतील या एलिगंट लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.