Sankruti Balgude : स्काय ब्लू ड्रेस, फुलांची साथ अन् नदीकिनारा; संस्कृती बालगुडे रमली निसर्गाच्या सान्निध्यात, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
यावेळी तिने आईच्या पिंगोरी गावातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये संस्कृती स्काय ब्लू रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत असून तिचा साधा आणि फ्रेश लूक लक्ष वेधून घेत आहे.
गावातील हिरवळ, नदीचा शांत परिसर आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे तिच्या फोटोंना एक वेगळीच सुंदर पार्श्वभूमी मिळाली आहे.
फुलांनी बहरलेला परिसर आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले क्षण या फोटोंमधून पाहायला मिळतात.
मोकळ्या हवेत, नदीकिनारी आणि निसर्गरम्य वातावरणात संस्कृतीने मनमुराद फोटोशूट केल्याचे दिसते.
तिच्या या फोटोंमध्ये ग्लॅमरपेक्षा साधेपणा आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक भावते.
हे फोटो मागील वर्षीच्या दिवाळीतील असून वर्षभरानंतर तिने ते चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
संस्कृतीचे हे सुंदर फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
(सर्व छायाचित्र : Instagram/sanskruti_balgude_official)