Sara Ali Khan Style : सारा अली खानच्या इंडो-वेस्टर्न लूकची भुरळ; पेस्टल रंगात खुलले सौंदर्य, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या नव्या बेबी ब्लू लूकमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रसिद्ध डिझायनर फराज मनान यांच्या फॉल-विंटर २०२६ कलेक्शनमधील इंडो-वेस्टर्न पोशाखात साराचा अंदाज अतिशय मोहक दिसत आहे.
साराने बेबी ब्लू रंगाचा स्लीव्हलेस हॉल्टर नेक कुर्ता परिधान केला असून, त्यावरील चंदेरी सिक्विन्स आणि नाजूक मण्यांचे नक्षीकाम पोशाखाला खास चमक देत आहे.
या कुर्त्यावरील गुलाबी-पीच आणि गोल्डन रंगछटांमधील फुलांचे तसेच पेस्ली डिझाइनमधील नक्षीकाम तिच्या पोशाखाचे सौंदर्य अधिक खुलवत आहे.
या कुर्त्यासोबत साराने त्याच रंगाची घेरदार हॅरेम स्टाइल धोती पँट परिधान केली आहे. त्यामुळे तिच्या लूकला मॉडर्न आणि आरामदायी टच मिळाला आहे.
पोशाखाचे नक्षीकाम उठून दिसावे यासाठी साराने जड दागिने टाळले असून, नाजूक कानातले, आकर्षक अंगठ्या आणि चंदेरी हाय हिल्सची निवड केली आहे.
गुलाबी गाल, न्यूड पिंक लिपस्टिक, हलका मेकअप आणि मोकळे लहरी केस यामुळे साराचा संपूर्ण लूक अधिक नाजूक आणि आकर्षक दिसत आहे.
सणासुदीत नेहमीच्या भरजरी कपड्यांपेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल, तर साराचा बेबी ब्लू इंडो-वेस्टर्न लूक नक्कीच प्रेरणा देणारा आहे.