‘धुरंधर’च्या म्युझिक लॉन्चमध्ये अभिनेत्री सारा अर्जुनची स्टाइल भारीच; १.५० लाखांच्या जॅकेटने वेधलं लक्ष, Photos पाहा
Mayuri Gawade
धुरंधर: द रिव्हेंजच्या म्युझिक लॉन्चमध्ये सारा अर्जुनने एंट्री करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
रणवीर सिंगसोबत दिसलेल्या साराने या कार्यक्रमात ग्लॅमर आणि हटके स्टाइलचा छान मिलाफ दाखवला.
या खास लूकसाठी तिने अनामिका खन्नाचा स्टायलिश थ्री-पीस आउटफिट निवडला होता.
काळ्या क्रॉप टॉपवर केलेलं लाल, निळ्या आणि काळ्या रंगांचं बीडवर्क तिच्या लूकला वेगळीच उठावदार झलक देत होतं.
त्यासोबतचा साधा काळा मिडी स्कर्ट लूकला बॅलन्स देत होता आणि जॅकेटकडे लगेच लक्ष जात होतं.
तिच्या आउटफिटची खरी जान ठरलं ते बहुरंगी ट्रायबल प्रिंटचं लाँग जॅकेट, ज्याची किंमत तब्बल ₹१.५० लाख असल्याचं सांगितलं जात आहे.
सॅफायर, डायमंड आणि एमराल्ड असलेले इअररिंग्स, बांगडी आणि रिंगमुळे तिचा लूक आणखी रॉयल दिसत होता.
स्मोकी आयज, न्यूड लिप्स आणि सरळ मोकळ्या केसांसह सारा अर्जुनचा हा लूक फॅशनप्रेमींसाठी खास ठरला. | All Photos : Instagram (Sara Arjun)