काळ्या गाऊनमध्ये सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अंदाज; आई अंजली अन् वहिनी सानियासोबतचेही खास फोटो पाहा

Mayuri Gawade

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर आपल्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने काळ्या रंगाच्या गाऊनमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबईत पार पडलेल्या 'द अर्थशॉट प्राइज २०२६' सोहळ्यासाठी साराने काळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
या फोटोशूटमध्ये साराने लांब काळ्या गाऊनमध्ये उभे राहून सुंदर पोज दिली आहे. मागील बाजूला असलेला गोलाकार प्रकाश आणि तिची सावली यामुळे फोटो अधिक आकर्षक दिसत आहे.
साराने या फोटोशूटमध्ये काही हटके पोजही दिल्या आहेत. हलक्या हालचालींमुळे चेहरा धूसर दिसणाऱ्या या फोटोमध्ये तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो.
पाठीमागून खुला असलेला काळा गाऊन, मोकळे सोडलेले लांबसडक केस आणि डोक्यावर ठेवलेला हात अशा पोजमध्ये साराने तिचा संपूर्ण लूक दाखवला आहे.
साराने याच फोटोशूटमधील एक ब्लॅक अँड व्हाइट फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचे सुंदर हास्य आणि मागे पडलेली सावली लक्ष वेधून घेत आहे.
साराने या सोहळ्यानिमित्त आई अंजली तेंडुलकर आणि वहिनी सानिया चंडोक यांच्यासोबतही खास फोटो काढले आहेत. तिघींच्या सुंदर गाऊनमधील लूकने लक्ष वेधून घेतले आहे.
शेवटच्या फोटोमध्ये सारा आणि सानिया या दोघी अंजली तेंडुलकर यांच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसत आहेत. या गोड फोटोमधून तिघींमधील प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.
All Phots : Instagram | Sara Tendulkar, Saaniya Chandhok