एक झाड, गाणं आणि वचन! अभिनेता सारंग साठ्ये आणि पॉलाने शेअर केले लग्नाचे सुंदर फोटो
नेहा जाधव - तांबे
मराठी डिजिटल जगतातले लोकप्रिय कपल अभिनेता सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन यांनी आपल्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. | (All Photo - Insta/sarangsathaye)
१२ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला.
अन् २८ सप्टेंबर रोजी कॅनडा येथे त्यांनी अत्यंत खासगी समारंभात लग्नगाठ बांधली.
‘डीप कोव्ह’ (Deep Cove) या निसर्गरम्य ठिकाणी त्यांच्या आवडत्या झाडाजवळ कुटुंबीय आणि निवडक मित्र - मैत्रिणींसोबत त्यांनी हा सोहळा आनंदाने साजरा केला.
त्यांच्या लग्नाची बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांनाही सुखद धक्का बसला.
सारंग म्हणाला, लग्न त्यांच्यासाठी प्राधान्य नव्हतं, पण त्यांना मागच्या वर्षी पहिल्यांदाच विभक्त होण्याची भीती वाटली. तेव्हा त्यांनी प्रेम आणि मैत्री टिकवण्यासाठी लग्नाचा टप्पा गाठणे गरजेचे असल्याचं जाणवलं.
तर, पॉलाने लग्नाचे हे सुंदर फोटो शेअर करत म्हंटले, कुटुंबीय, मित्रमंडळी, शपथविधी, अंगठ्या, सही आणि एक गाणं अशा सुंदर वातावरणात आम्ही आमचा सोहळा साजरा केला.
पॉला आणि सारंग यांनी एकमेकांना वचन दिले की आम्ही जसे आहोत तसेच प्रेमी आणि सर्वोत्तम मित्र राहण्याचा प्रयत्न करू.