पावसाळ्यातील खास अंदाज! सावनी रवींद्रचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत
किशोरी घायवट-उबाळे
पावसाळी फोटोशूटची झलक : हिरव्यागार निसर्गात काळ्या छत्रीसोबत सावनी रवींद्रने सुंदर फोटो शेअर केले.
साधा पण आकर्षक लूक : स्लीव्हलेस प्रिंटेड ड्रेस आणि मोकळ्या केसांमधील तिचा लूक चाहत्यांना भावला.
पावसाचा मनमुराद आनंद : रिमझिम सरींचा आनंद घेतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
चाहत्यांसाठी खास संदेश : "The rains are beautiful… but so is taking care of yourself" असे म्हणत तिने स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
पावसाळ्यात गरम पेयाचा आस्वाद घ्या, शक्यतो घरात राहा आणि सुरक्षित राहा, असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव : सावनीच्या या पावसाळी फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कौतुकाच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.