सायली संजीवचा अमेरिकेत 'देसी गर्ल' अंदाज! गुलाबी-हिरव्या साडीत खुललं सौंदर्य
Mayuri Gawade
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव सध्या अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत असून तिने तिथले काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
परदेशातील सुंदर लोकेशन्सना भेट देताना सायलीने गुलाबी, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या छटा असलेली आकर्षक साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपरिक साडीला तिने पांढऱ्या रंगाच्या स्लीव्हलेस ब्लाऊजची जोड दिल्यामुळे तिच्या लूकला स्टायलिश आणि मॉडर्न टच मिळाला आहे.
साधा मेकअप, मोकळे केस आणि चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य यामुळे सायलीचा हा लूक अधिकच फ्रेश आणि एलिगंट दिसत आहे.
कानात नाजूक झुमके आणि हातात घड्याळ अशा मोजक्या अॅक्सेसरीजमुळे सायलीने आपला संपूर्ण लूक साधा पण उठावदार ठेवला आहे.
अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर साडीतील सायलीचा हा देसी अंदाज विशेष उठून दिसत असून तिच्या चाहत्यांनाही हा लूक चांगलाच पसंत पडला आहे.
प्रवासाचा आनंद घेतानाच सायलीने तिच्या फॅशन स्टाइलची झलकही या फोटोंमधून दाखवली असून तिच्या प्रत्येक फोटोमध्ये वेगळाच चार्म पाहायला मिळतो.
सायलीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले असून तिच्या सुंदर साडी लूकवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
| All Photos : Instagarm : Sayali Sanjeev