पावसाळ्यात युनिफॉर्म वाळवणं झालं सोपं! फक्त 'या' ८ टिप्स ठेवा लक्षात

Mayuri Gawade

पावसाळ्यात सततच्या पावसामुळे मुलांचे शाळेचे युनिफॉर्म वेळेवर वाळत नाहीत. पण काही सोप्या ट्रिक्स वापरल्यास सकाळची धावपळ टाळता येऊ शकते.
युनिफॉर्म धुतल्यानंतर शक्य तितके पाणी काढून टाका. वॉशिंग मशीनचा 'स्पिन' मोड वापरल्यास कपड्यांतील ओलावा पटकन कमी होतो.
ओला युनिफॉर्म मोठ्या कोरड्या टॉवेलमध्ये गुंडाळून हलकेच दाबा. टॉवेल अतिरिक्त पाणी शोषून घेत असल्याने कपडे लवकर सुकतात.
कपडे दोरीवर घडी घालून टांगण्याऐवजी हँगरवर लटकवा आणि पंख्याखाली किंवा खिडकीजवळ ठेवा. हवेमुळे युनिफॉर्म जलद कोरडा होतो.
तातडीने युनिफॉर्म हवा असेल तर हेअर ड्रायर वापरा. विशेषतः कॉलर, कफ आणि बटणांच्या भागावर गरम हवा दिल्यास ते भाग लवकर सुकतात.
कपडे पूर्णपणे ओले असताना इस्त्री करू नका. थोडे दमट असताना त्यावर सुती कापड ठेवून इस्त्री केल्यास उरलेला ओलावा पटकन निघून जातो.
वाळत घालताना दोन कपड्यांमध्ये योग्य अंतर ठेवा आणि हवेशीर जागा निवडा. यामुळे हवा खेळती राहते आणि कपडे लवकर वाळतात.
घरात एसी असेल तर 'ड्राय मोड'मध्ये युनिफॉर्म हँगरला लटकवून ठेवा. खोलीतील दमटपणा कमी झाल्याने कपडे नैसर्गिकरित्या सुकतात.
पावसाळ्यात शक्य असल्यास मुलांसाठी दोन किंवा तीन युनिफॉर्म तयार ठेवा. त्यामुळे ओले कपडे आणि सकाळची घाई दोन्ही टाळता येईल. | All Photos : AI Generated