बजेट-फ्रेंडली Secret Santa: ५०० रुपयांत मिळणारे बेस्ट ऑफिस गिफ्ट्स
Mayuri Gawade
ख्रिसमस म्हंटलं की पहिल्यांदा डोक्यात काय येत असेल तर ते म्हणजे, सांताक्लॉज आणि त्याच्या भेटवस्तू. आजकाल अनेक ऑफिसमध्ये Secret Santa सेलिब्रेशनचा ट्रेंड जास्तच वाढलाय. कोणाच्या नावाची चिठ्ठी येईल, कोणासाठी गिफ्ट घ्यायचं याची उत्सुकता ऑफिसमध्ये वेगळीच रंगत आणते.
| सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
तुमच्याही ऑफिसमध्ये यंदा तुम्ही सांताक्लॉज झाला असाल आणि नेमकं काय गिफ्ट द्यायचं? हा million-dollar प्रश्न डोक्यात फिरत असेल, तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ५०० रुपयांच्या आत मिळणाऱ्या खास, क्रिएटिव्ह, उपयोगी आणि हमखास impress करणाऱ्या बजेट-फ्रेंडली गिफ्ट आयडियाज!
क्वर्की मग किंवा इन्स्पिरेशनल कोट्सचे कप- ऑफिसमध्ये सर्वाधिक वापरला जाणारी गोष्ट म्हणजे चहाचा किंवा कॉफीचा कप. “Good Vibes Only”, “Monday Motivation” किंवा “You Got This!” असे कोट्स असलेले क्वर्की मग ३०० ते ४५० रुपयांच्या बजेटमध्ये सहज मिळतात आणि रोज वापरात येतात.
पर्सनल डायरी / डेस्क प्लॅनर - नवीन वर्षाची सुरुवात नीटनेटकी व्हावी यासाठी डायरी किंवा डेस्क प्लॅनर हा एकदम उपयोगी गिफ्ट ठरतो. रंगीबेरंगी कव्हर्स, आकर्षक डिझाइन्स आणि हार्डकव्हर असलेले २०२५ प्लॅनर्स ४०० ते ५०० रुपयांत मिळतात.
सुगंधी कँडल्स (Scented Candles) - ऑफिस किंवा घरी ठेवताच मूड फ्रेश करणाऱ्या सुगंधी कँडल्स; जसे लॅव्हेंडर, व्हॅनिला किंवा लेमनग्रास हिवाळी सिझनसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहेत. या कँडल्स २५० ते ४५० रुपयांत उपलब्ध असतात.
क्यूट डेस्क डेकोर वस्तु - लहानसा फेक प्लांट, मिनी सक्युलेंट, स्मायली स्ट्रेस बॉल, कोट स्टँड किंवा लहानशी फोटो फ्रेम ह्या सर्व वस्तु ऑफिस डेस्कला आकर्षक बनवतात. दिसायला गोड आणि बजेटमध्ये मावणारे पर्याय.
कस्टमाईज्ड चॉकलेट बॉक्स- चॉकलेट कोणाला नाही आवडत? छान पॅकिंग केलेला assorted chocolates चा छोटा गिफ्ट बॉक्स २०० ते ३०० रुपयांत मिळतो आणि सिक्रेट सांता गिफ्ट म्हणून नेहमीच लोकप्रिय ठरतो.
मिनी पोर्टेबल ह्युमिडिफायर (Mini Portable Humidifie) - एसी ऑफिसमध्ये हिवाळ्यात कोरडी हवा त्रासदायक होऊ शकते. अशावेळी छोटंसं USB ह्युमिडिफायर हा खूपच उपयोगी आणि थंडीत आराम देणारा पर्याय ठरतो. हे साधारणपणे ५०० रुपयांच्या आसपास मिळतं.
ट्रॅव्हल-साइज ग्रुमिंग किट्स - पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही वापरता येतील अशी फेसवॉश, हँडक्रीम, मिनी परफ्यूम वगैरे असलेली छोटी ग्रुमिंग किट्स ४५० रुपयांच्या आत उपलब्ध असतात. प्रवास करणाऱ्यांसाठीही ही भेट उत्तम.
प्रेरणादायी पुस्तके (Pocket Editions) - रॉबिन शर्मा, जय शेट्टी, मार्क मॅन्सन यांसारख्या लेखकांची पॉकट-साईज प्रेरणादायी पुस्तके वाचायला सोपी आणि रोजची motivation देणारी असतात. ही पुस्तके २५० ते ४५० रुपयांत मिळतात.
फोन स्टँड, पॉपसॉकेट किंवा केबल ऑर्गनायझर - तांत्रिक गिफ्ट्स ऑफिसमध्ये नेहमीच उपयोगी पडतात. आकर्षक पॉपसॉकेट्स १०० ते १५० रुपयांत मिळतात, तर मजबूत फोन स्टँड २०० ते ३०० रुपयांच्या बजेटमध्ये येतो. केबल ऑर्गनायझरही एक चांगला पर्याय आहे.
हँडरिटन नोट + छोटं गिफ्ट कॉम्बो
सिंपल, मनाला भिडणारं आणि भावनिक अशी भेट देऊ इच्छित असाल तर छोटंसं गिफ्ट आणि सोबत स्वतः लिहिलेली शुभेच्छांची नोट हा परफेक्ट पर्याय आहे. स्वस्त, पण मन जिंकणारा!