Sharvari Kulkarni : पिवळी पैठणी, मोत्यांची नथ अन् मनमोहक हास्य; शर्वरी कुलकर्णीचा पारंपरिक लूक ठरतोय खास
किशोरी घायवट-उबाळे
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी-बोरकर हिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शर्वरीचा सोज्वळ आणि पारंपरिक मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
तिने पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली असून, त्यावर गुलाबी रंगाचा आकर्षक काठ आहे. या काठावर कमळाची फुले आणि मोरांची सुरेख नक्षी पाहायला मिळते.
पारंपरिक लूकला चारचाँद लावण्यासाठी तिने नाकात मोत्यांची नथ, गळ्यात मोत्यांचा चोकर आणि लांब हार घातला आहे.
कानातील झुमके आणि केसांचा पारंपरिक अंबाडा यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे.
बागेतील पायवाटेवर दिलेल्या मनमोहक पोझनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शर्वरीच्या या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
(सर्व फोटो - शर्वरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)