हात नसतानाही चालवते तीर; वयाच्या १८ व्या वर्षी इतिहास रचणारी कोण आहे शीतल देवी?
नेहा जाधव - तांबे
वयाच्या १८ व्या वर्षी पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन बनून शीतल देवीने एका तुर्की खेळाडूला हरवून सुवर्णपदक जिंकले. | (All Photo - sheetal_archery)
तिने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची तुर्कीची ओझनूर क्युर गिर्डी हिचा १४६-१४३ असा पराभव केला.
या स्पर्धेत एकमेव हात नसलेली धनुर्धारी शीतल तिच्या पायांनी आणि हनुवटीने बाण मारते. १८ वर्षीय शीतलचे या अजिंक्यपद स्पर्धेतील हे तिसरे पदक होते.
हातांशिवाय धनुर्विद्या खेळणारी भारतातील पहिली धनुर्विद्यापटू शीतल देवी हिचा जन्म १० जानेवारी २००७ रोजी जम्मू-काश्मीरमधील लोईधर गावात झाला.
फोकोमेलिया हा दुर्मिळ आजार तिला जन्मत: च झाल्याने तिच्या हातांची वाढ झालीच नाही.
पण, जन्मजात हात नसतानाही शीतलने कधीही हार मानली नाही. तिला लहानपणीच झाडावर चढायची आवड होती.
२०२१ मध्ये जम्मू - काश्मीरमधील किश्तवाड येथे भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या एका युवा कार्यक्रमात लष्कराच्या प्रशिक्षकांना शीतलमधली खेळाडू वृत्ती दिसून आली.
शीतल देवीच्या प्रशिक्षकांचे सुरुवातीचे प्रयत्न असफल झाले. त्यांनी कृत्रिम शस्त्रेही वापरले पण ते असफल झाले.
शीतल देवीच्या प्रशिक्षकांना एक हात नसलेल्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या धनुर्धारी मॅट स्टुट्झमन बद्दल समजले. जीने जिंकण्यासाठी आपल्या पायांचा वापर केला होता. इथेच शीतलच्या कारकिर्दीला दिशा मिळाली.
शीतल तिरंदाजी प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांच्या अकादमीमध्ये सामील झाली. शीतलने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सक्षम तिरंदाजांशी स्पर्धा केली आणि तिच्या कामगिरीने लक्ष वेधून घेतले.
अनेक खेळाडूंना त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, परंतु शीतल देवीने खूप कमी वेळात आपला ठसा उमटवला.