Sheetala Saptami 2025: शीतलामातेच्या पूजेसाठी स्वादिष्ट शाही केसर भात कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Kkhushi Niramish

शीतलामाता पूजन हा हिंदू धर्मात उन्हाळ्यातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार उन्हाळ्यातील किंवा अन्य संसर्गजन्य रोग आणि आजार होऊ नये यासाठी शीतलामातेची पूजा केली जाते. ही पूजा होळीनंतरच्या सप्तमी किंवा अष्टमीला केली जाते. (Sheetala Saptami 2025) जाणून घ्या या पूजेसाठी खास शाही केसर भात कसा बनवायचा. ( All Photo - Youtube - @swayuuuuumpak1622)
साहित्य - तांदूळ, तूप, केसर, साखर, सुका मेवा, लवंग
सर्वप्रथम तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून सर्व सुका मेवा हलकेच भाजून घ्या.
एका वाटीत पाणी घेऊन त्यात केसर छान भिजू द्या.
तांदळात लवंग घालून कुकरमध्ये तुपात प्रथम छान भाजून घ्या. यामुळे लवंगाचे आरोग्यदायी गुण लाभतात.
नंतर भात शिजायला ठेवून त्यात विलायची आणि साखर घाला. तुम्ही आख्खी विलायचीही टाकू शकता किंवा विलायची पूडही टाकू शकता. सोबतच केसराचे तयार पाणीही त्यात घाला.
भात निम्मा शिजल्यानंतर त्यामध्ये छान सुकामेवा घाला आणि आणखी काही वेळ शिजू द्या.
अशा प्रकारे शीतलामातेच्या पूजेसाठी शाही केसर भात तयार आहे. तुम्ही हा भात दह्यासोबत खाऊ शकता.