'मोका पे चौका' म्हणत शिल्पा शेट्टीने शेअर केले ग्लॅमरस फोटो; चॉकलेटी शिमरी साडीत दिसतेय कमालीची सुंदर
Mayuri Gawade
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही नेहमीच चर्चेत असते.
वयाच्या पन्नाशीतही शिल्पाचे सौंदर्य, आत्मविश्वास आणि एलिगंट स्टाईल चाहत्यांना कायमच आकर्षित करताना दिसते.
यावेळी शिल्पाने चॉकलेटी ब्राऊन रंगाची शिमरी डिझायनर साडी परिधान करून एक वेगळाच रॉयल लूक केला आहे.
या साडीसोबत तिने हेवी एम्बेलिश्ड स्लीव्हलेस ब्लाऊजची निवड केली असून, त्यामुळे तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.
मोठे झुमके, स्टायलिश ब्रेसलेट आणि अंगठी अशा ज्वेलरीने तिने आपल्या लूकला परफेक्ट फिनिशिंग टच दिला आहे.
न्यूड मेकअप, मोकळे केस आणि आकर्षक पोझमुळे शिल्पाचा हा फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या फोटोंना तिने 'Mocha Pe Chauka' असे हटके कॅप्शन दिले असून, त्याचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
शिल्पाच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कौतुकाच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. | All Photos : Shilpa Shetty | Instagram