शिल्पा शेट्टीने नेसलेल्या साडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा; पाहा फोटो!

Swapnil S

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
शिल्पा शेट्टी आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता अभिनेत्रीने साडीत स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. अनेकांनी शिल्पा हिची साडी प्रचंड आवडली आहे. एक नेटकरी फोटोवर कमेंट करत म्हणाला, 'चर्चा फक्त साडीची...'
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.