पारंपरिक वेशात खुललं अश्विनी महांगडेचं सौंदर्य; शिवजयंतीनिमित्त फोटो शेअर करत म्हणाली, "हीच खरी मानवंदना...

किशोरी घायवट-उबाळे

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अश्विनी महांगडेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून फोटोशूट करत महाराजांना अभिवादन केले आहे. | (सर्व छायाचित्रे: Instagram/@ashvinimahagade)
पिवळ्या रंगाची नऊवारी, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात ठुशी, कानात सोनेरी डूल, हातात लाल रंगाच्या बांगडया, पायात मोठे पैंजण आणि कोल्हापुरी चप्पल अशा पारंपरिक वेशातील फोटो अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केले आहेत.
अश्विनीने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
बांगड्या भरणे याचे अर्थ स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळे आहेत बरं..तिच्यासाठी शृंगार आहे बांगडी.. त्याच्यासाठी कमजोरपणा आहे बांगडी..असो…. असं तिने लिहिलं आहे.
"आज तिच्या मनगटात ताकद असायला हवी, तिने स्वतःच रक्षण स्वतः करायला हवं...मग या 'शिवजयंतीला शपथ घेवूया की 'हो आम्ही तयार राहू', हीच खरी मानवंदना. हर हर महादेव!" अशी कॅप्शन तिने एका फोटोला दिली आहे.
हातात काठी घेऊन शूट केलेल्या फोटोंमधून अश्विनीचा मर्दानी लूकची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
"आपल्या लेकी-बाळी तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा त्यांच्या मनगटात असेल ताकद..नुसती शिवजयंती साजरी करून चालणार नाही तर ती साजरी करण्यालायक बनायला हवं…" अशीही कॅप्शन तिने दिली आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील राणूबाई शिवाजीराजे भोसले यांची भूमिका अश्विनीने साकारली होती. त्यातील तिचा पारंपरिक लूक प्रेक्षकांना आवडला होता.
त्यानंतर आता अश्विनीने शिवजयंतीनिमित्त केलेले पारंपरिक फोटोशूट चर्चेत आले आहे.