‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब तिच्या खास पारंपरिक लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शिवालीने नुकतेच गुलाबी पैठणी साडीतील काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या रेशमी पैठणीत शिवालीचा मराठमोळा अंदाज खुलून दिसत असून तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवालीच्या पैठणीच्या पदरावर असलेले पारंपरिक नक्षीकाम आणि मोराची सुंदर डिझाइन साडीला आणखी आकर्षक बनवत आहे.
पैठणीसोबत शिवालीने गळ्यात मोत्यांचा आणि खड्यांचा डिझायनर चोकर घालून तिच्या पारंपरिक लूकला ग्लॅमरस टच दिला आहे.
कानातील मॅचिंग झुमके आणि नाकातील सुंदर नथ यामुळे शिवालीचा मराठमोळा साज आणखी खुलून दिसत आहे.
हातात पारंपरिक पाटल्या आणि मोत्यांची मोठी अंगठी घालून शिवालीने पैठणीसोबत अगदी साजेशी ज्वेलरी कॅरी केली आहे.
लांबसडक केसांची वेणी, त्यावर माळलेले लाल गुलाब आणि पारंपरिक केसांचे दागिने शिवालीच्या या लूकचे खास आकर्षण ठरत आहेत.
प्लेन बॅकड्रॉपसमोर शिवालीने दिलेल्या वेगवेगळ्या पोझेसमुळे तिची गुलाबी पैठणी आणि संपूर्ण पारंपरिक लूक अधिकच उठून दिसत आहे.
शिवालीचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून ‘Dream girl’ आणि ‘माझी सुंदरी’ अशा कमेंट्स करत चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. | All Photos : Instargram | Shiviali Parab