साधेपणातही उठून दिसला शिवाली परबचा ग्लॅमरस लूक; गुलाबी साडीतील फोटो व्हायरल

किशोरी घायवट-उबाळे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने गुलाबी साडीतील नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुलाबी साडीसोबत गडद हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज तिच्या लूकला वेगळीच उठावदार झलक देतो.
एका हातातील काचेच्या हिरव्या बांगड्यांनी तिच्या मराठमोळ्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्याची भर घातली आहे.
मोजके दागिने आणि साधा पेहराव यामुळे शिवालीचा एलिगंट अंदाज चाहत्यांना भावला.
मोकळे केस, हलका मेकअप आणि नाकातील नाजूक चमकीमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे.
या फोटोशूटला शिवालीने A rose असे कॅप्शन देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
स्टायलिश आणि मराठमोळ्या अंदाजामुळे शिवाली परबचा हा फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.