Shivali Parab Look : लाल सिल्क साडी, नथ अन् मोहक अदा; शिवाली परबच्या मराठमोळ्या लूकवर चाहते फिदा

किशोरी घायवट-उबाळे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबने नुकतेच लाल साडीतील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी शिवालीने लाल रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली असून, त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
सुंदर हार, कानातले, बांगड्या आणि मराठमोळी नथ अशा पारंपरिक दागिन्यांनी तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
शिवालीच्या या फोटोशूटमध्ये तिचा सोज्वळ आणि देखणा अंदाज पाहायला मिळत आहे.
सिल्क साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजच्या कॉम्बिनेशनमुळे शिवालीचा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.
शिवालीने हे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून, तिच्या या लूकची सध्या चर्चा रंगली आहे.
सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून शिवाली घराघरांत पोहोचली. तिच्या विनोदी अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
नेहमी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवणारी शिवाली या पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
(Photos - Instagram/@parabshivali)