Photo: शिवानी आणि अजिंक्य अडकले लग्नबंधनात, चाहत्यांना सुखद धक्का

Rutuja Karpe

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.
फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गुरुवारी (1 फेब्रुवारी) ला ठाण्यातील येऊर रिसॉर्टमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघांनीही खास लूक केला होता.
शिवानी ने बदामी लेहेंगा घातला होता. तर, अजिंक्यने सूट परीधान केला होता.
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. "अखेर बंधनात" असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोंमध्ये शिवानी-अजिंक्य खूपच आनंदी दिसताय. चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवानी-अजिंक्यने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
शिवानी-अजिंक्यची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली होती.
मालिका संपल्यानंतर ते पुन्हा एकमेकांना भेटू लागले. 2016 पासून ते एकमेकांना डेट करत होते.
शिवानी आणि अजिंक्य हे आता लग्नबंधनात अडकले आहेत.