Fashion Tips : उंच दिसायचंय? 'या' स्टायलिंग टिप्स ठेवा लक्षात
Swapnil S
उंची कमी असली तरी योग्य कपड्यांची निवड केली तर तुम्ही सहज उंच आणि स्मार्ट दिसू शकता.
फक्त styling मध्ये छोटे बदल केले, की तुमचा पूर्ण लुकच बदलतो.
१. Vertical Stripes (उभे पट्टे) - उभ्या पट्ट्यांचे टॉप्स शरीराला लांब दाखवतात, त्यामुळे उंची जास्त वाटते. ऑफिस किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा लुक उत्तम ठरतो.
२. High Waist Pants - हाय वेस्ट पॅन्ट्समुळे पाय लांब दिसतात आणि बॉडी proportion balanced वाटतो. ऑफिस, मीटिंग किंवा स्मार्ट कॅज्युअल लुकसाठी हा परफेक्ट पर्याय आहे.
३. Monochrome Look - एकाच रंगाचे कपडे घातल्याने शरीरात break दिसत नाही आणि लुक continuous वाटतो. फॉर्मल इव्हेंट्स किंवा डे-आऊटसाठी हा लुक खूप क्लासी दिसतो.
४. V-Neck Top - V-नेक टॉप्समुळे मान लांब दिसते आणि upper body elongated वाटतो. कॅज्युअलपासून पार्टीपर्यंत कुठेही सहज वापरता येतो.
५. Short / Cropped Top - शॉर्ट किंवा क्रॉप टॉपमुळे पाया कडचा भाग मोठा दिसतो आणि उंची visually वाढते. डे-आऊट, ट्रॅव्हल किंवा फ्रेंड्ससोबतच्या प्लॅनसाठी हा लुक ट्रेंडी आहे.
६. Well-Fitted Clothes- फिट कपडे शरीराचा shape नीट दाखवतात आणि लुक नीटनेटका दिसतो. ऑफिस, फॉर्मल किंवा डेली वेअर सर्व ठिकाणी ही स्टाइल सेफ आणि स्मार्ट आहे.