पावसाळ्यात दही खावं की नाही?

Suraj Sakunde

पावसाळा सुरु झाला की गरमीपासून सुटका मिळते, हे खरं असलं तरी पावसाळ्यात आजारांचं प्रमाणही वाढतं हे तितकंच खरं आहे.

वातावरणातील बदलामुळं आरोग्याशी संबंधित अनेक समस्या येऊ शकतात. त्यामुळं आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

आयुर्वेदातील नियमांनुसार विशिष्ट ऋतूंमध्ये काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात जास्त दही खाऊ नये. त्यामुळं शरीराला नुकसान होऊ शकतं.

आरोग्यतज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये जास्त दही खाल्ल्यानं त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.

त्वचेवर खाज, फंगल इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.

पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. चयापचय कार्य बिघडू शकतं.

आयुर्वेदानुसार पावसाळ्यात जास्त दही खाल्ल्यानं खोकला, ताप, सर्दी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.