नऊवारीपासून पैठणीपर्यंत; 'ईठा'च्या प्रमोशनमधील श्रद्धा कपूरचे ५ लूक ठरतील लग्नसराईसाठी खास

Mayuri Gawade

लग्नसराई सुरू झाली असून, लग्नात कोणती साडी नेसायची आणि त्यावर दागिने कसे घालायचे, असा प्रश्न अनेक मुलींना पडतो. अशावेळी श्रद्धा कपूरच्या या पाच पारंपरिक लूकमधून तुम्ही खास स्टाइलिंगच्या कल्पना घेऊ शकता.
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रमोशनदरम्यान श्रद्धाचे वेगवेगळ्या साड्यांमधील सुंदर लूक पाहायला मिळत आहेत.
हिरव्या रंगाची सोनेरी काठाची नऊवारी साडी नेसून श्रद्धाने सुंदर मराठमोळा लूक केला आहे. लग्नातील पारंपरिक कार्यक्रमांसाठी तुम्हीही अशा प्रकारची हिरवी नऊवारी निवडू शकता.
हिरव्या नऊवारीवर श्रद्धाने गळ्यात हार, कानात झुमके, हातात बांगड्या आणि कमरेला कमरपट्टा घातला आहे. केसांचा अंबाडा बांधून त्यात फुले माळल्यास हा लूक आणखी खुलून दिसेल.
श्रद्धाने नारिंगी रंगाची सोनेरी नक्षीकाम असलेली साडी नेसली आहे. त्यावर त्याच रंगाचा भरजरी ब्लाऊज घातला आहे. लग्नातील संगीत किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी असा लूक निवडू शकता.
या लूकमध्ये श्रद्धाने गळ्यात सुंदर सोनेरी हार आणि कानात मॅचिंग दागिने घातले आहेत. केस मोकळे ठेवून आणि हलका मेकअप करून तुम्हीही साडीवर हा लूक करू शकता.
श्रद्धाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली असून, तिच्या काठावर नाजूक पांढरे नक्षीकाम आहे. त्यावर त्याच रंगाचा ब्लाऊज घातला आहे. लग्नातील खास कार्यक्रमांसाठी असा लाल रंगाचा लूक निवडू शकता.
या लाल साडीवर श्रद्धाने नथ, गळ्यात हार आणि हातात बांगड्या घातल्या आहेत. केसांची वेणी बांधून त्यात पांढऱ्या फुलांचा गजरा माळला आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पारंपरिक लूक पूर्ण करू शकता.
समुद्रकिनारी केलेल्या फोटोशूटमध्ये श्रद्धाने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. त्यावर गुलाबी रंगाचा नक्षीदार ब्लाऊज घातला आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी असा लूक छान दिसू शकतो.
पिवळ्या साडीवर श्रद्धाने गळ्यात चोकर आणि कानात झुमके घातले आहेत. मोकळे केस आणि हलका मेकअप करून तुम्हीही हा लूक ट्राय करू शकता.
श्रद्धाने जांभळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. त्यावर गुलाबी रंगाचा नक्षीदार ब्लाऊज घातला असून, लग्नातील पारंपरिक कार्यक्रमांसाठी तुम्हीही असा लूक करू शकता.
या साडीवर श्रद्धाने नथ, बांगड्या आणि पारंपरिक दागिने घातले आहेत. केसांमध्ये फुलांचा गजरा माळून तुम्हीही तिच्यासारखा मराठमोळा लूक करू शकता.
All Photos : Instagram | Shraddha Kapoor