बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
३० ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रद्धाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये श्रद्धाने जांभळ्या आणि गुलाबी रंगांची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. या साडीतील तिचा मराठमोळा अंदाज विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पारंपरिक लूकला साजेशी ठुशी, नाकातील नथ आणि हातातील हिरव्या-जांभळ्या बांगड्यांमुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
केसांमध्ये माळलेला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि कपाळावरील छोटीशी टिकली यामुळे श्रद्धाचा हा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.
विशेष म्हणजे, एका फोटोमध्ये श्रद्धा हातात घुंगरू घेऊन खास अंदाजात पोझ देताना दिसते. तिच्या या फोटोने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे.
हे फोटो शेअर करताना श्रद्धाने Aaj trailer nahi aa raha hai, Eetha aa rahi hai Eetha अशी हटके कॅप्शन दिली आहे. तिच्या या कॅप्शनमधून चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलचा उत्साह पाहायला मिळतो.
श्रद्धाचा हा नऊवारी साडीतील मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे.