बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच श्रद्धा सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिच्या नवनवीन फोटोंना चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळते.
श्रद्धा कपूरचा बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी श्रद्धाने समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी श्रद्धाने पिवळ्या रंगाची सुंदर नेटची साडी नेसली आहे. साडीवरील नाजूक नक्षीकाम आणि आकर्षक किनार तिच्या पारंपरिक लूकला खास उठाव देत आहे.
पिवळ्या साडीसोबत श्रद्धाने गुलाबी आणि सोनेरी रंगाचा भरजरी ब्लाऊज परिधान केला आहे. या रंगसंगतीमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात श्रद्धाचे सौंदर्य आणखी खुलले आहे. तिच्या या मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
समुद्राच्या लाटा, मोकळ्या हवेत भुरभुरणारे केस आणि चेहऱ्यावरील गोड हास्य यामुळे श्रद्धाचे हे फोटो अधिकच आकर्षक दिसत आहेत.
गळ्यात चोकर हार, कानात झुमके, नाकात नथ आणि हातात रंगीबेरंगी बांगड्या अशा पारंपरिक दागिन्यांनी श्रद्धाने आपला लूक पूर्ण केला आहे.
पिवळ्या साडीचा पदर अलगद हातात धरून समुद्रकिनाऱ्यावर पोझ देणाऱ्या श्रद्धाचा अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे. तिच्या साध्या पण मोहक सौंदर्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
कधी लाजरे हास्य, तर कधी दिलखेचक पोझ अशा विविध अंदाजांत श्रद्धाने आपले सौंदर्य खुलवले आहे. तिच्या या पारंपरिक लूकवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.