श्रावणात 'हे' पदार्थ खाल तर निरोगी राहाल; उपवासातही मिळेल भरपूर ऊर्जा

किशोरी घायवट-उबाळे

पावसाळ्यामुळे पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असल्याने या काळात हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ - दूध, दही, ताक, पनीर आणि लस्सी हे प्रथिने व कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. श्रावणात भगवान शंकराला दूध अर्पण करण्याचीही परंपरा आहे.
सुका मेवा - बदाम, अक्रोड, काजू, मनुका, पिस्ता आणि खजूर यांसारखे ड्रायफ्रूट्स उपवासात शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात.
साबुदाणा - साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा खीर हे श्रावणातील उपवासासाठी लोकप्रिय आणि पोटभराचे पदार्थ आहेत.
बटाटा आणि रताळे - हे दोन्ही पदार्थ पोटभर राहण्यास मदत करतात आणि उपवासात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
सैंधव मीठ - उपवासात अनेकजण साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करतात.
मखाना - भाजलेला मखाना हा हलका, कुरकुरीत आणि पौष्टिक स्नॅक असून उपवासासाठी उत्तम पर्याय मानला जातो.
ताजी फळे - केळी, सफरचंद, पपई, डाळिंब, द्राक्षे, टरबूज, खरबूज आणि नाशपाती यांसारखी ताजी फळे शरीराला आवश्यक पोषक घटक देतात आणि पचायलाही हलकी असतात.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती ही सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. यातून ‘नवशक्ति’ कोणताही दावा करत नाही.)