श्रावणी सोमवारच्या उपवासात 'या' चुका करू नका; काय खावं, काय टाळावं पाहा
Mayuri Gawade
श्रावणी सोमवारचा उपवास करताना फक्त उपाशी राहणं पुरेसं नाही. दिवसभर ऊर्जा टिकून राहावी आणि पचन बिघडू नये यासाठी काय खायचं आणि काय टाळायचं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
उपवासात शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका. शहाळ्याचं पाणी, ताक आणि साधं पाणी दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने घेत राहा.
केळी, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळं उपवासात चांगला पर्याय ठरू शकतात. यातून शरीराला नैसर्गिक साखर, फायबर आणि तात्काळ ऊर्जा मिळते.
बदाम, अक्रोड, मखाना आणि पनीर यांसारखे पदार्थ पोट जास्त वेळ भरलेलं ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.
साबुदाण्यावरच अवलंबून राहण्याऐवजी भगर किंवा राजगिरा यांसारखे पर्यायही आहारात घेता येतात. हे पदार्थ तुलनेने हलके आणि पचायला सोपे ठरू शकतात.
साबुदाणा वडा, बटाटा वेफर्स आणि जास्त तेलकट उपवासाचे पदार्थ वारंवार खाणं टाळा. यामुळे पोट जड होणं, जळजळ किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो.
उपवासात गोड पदार्थ, साखरयुक्त पेये किंवा जास्त गोड ज्यूस पिणं टाळणं चांगलं. रक्तातील साखरेत अचानक चढ-उतार होऊ शकतात.
रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असेल तर ती कमी करा. त्याऐवजी दर २ ते ३ तासांनी थोडं फळ, मखाना किंवा हलकं उपवासाचं अन्न घेऊ शकता.
उपवासाचा अर्थ फक्त कमी खाणं नाही, तर योग्य खाणं आहे. रेडीमेड फरसाण, पॅक्ड वेफर्स आणि जास्त मीठ-मसाले टाळून ताजं, घरगुती आणि हलकं अन्न निवडणं अधिक चांगलं ठरेल. | All Photo : AI Generated