'मंडला मर्डर्स'मध्ये श्रीया पिळगावकरची दमदार भूमिका; वडिलांची लेकीसाठी खास पोस्ट

नेहा जाधव - तांबे

अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रीया पिळगावकर ही देखील उत्तम अभिनेत्री आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
श्रीया पिळगावकरची 'मंडला मर्डर्स' ही नवी वेब सीरिज नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
'मंडला मर्डर्स'मध्ये श्रीयाने रुक्मिणी ही आगळी वेगळी भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
तिचे वडील अभिनेते सचिन पिळगावकर यांनीही तिच्यासाठी पोस्ट लिहून तिचे कौतुक केले आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
त्यांनी म्हटलं आहे की, "रुक्मिणीच्या भूमिकेत श्रीयाचा अभिनय खूप वेगळा आणि मंत्रमुग्ध करणारा आहे." | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)
श्रीयाच्या कामाबद्दल तिचे आई-वडील, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर नेहमीच गर्व व्यक्त करत असतात. 'मंडला मर्डर्स'मधील तिचा अभिनय विशेष प्रशंसा मिळवत आहे. | (Photo -shriya.pilgaonkar/Insta)